Thursday, January 27, 2011

Friday, January 14, 2011

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ......

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ......

तिळगुळ घ्या गोड बोला........आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्या संगे भांडू नका .............   परत एकदा........ तिळगुळ घ्या गोड बोला........

Thursday, January 13, 2011

Wednesday, January 5, 2011

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी........

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी........
 
एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.......................

Tuesday, January 4, 2011

" मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते "


मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते "


मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते
त्यासाठीच ते  पकडून ठेवायचे असते
नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो
असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही नाकारू शकत नाही
 मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका
अस नात फक्त त्रास देत
पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका
 कारण ते हृदयात बसलेले असते "                  
  एकवार आपण कर्ज मानल, की ते देण माणसाच कर्तव्य आहे
 नाहीतर आपल्याला ते मनात मिंदय करत
मनात दास्य निर्माण करत
शून्यातने मिळालेला शेवटचा रुपया ही जुगारात लावायला आवडेल
 कारण मी शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो
 मग त्या रुपयातून का नाही पण हें सगळे चांगल्यासाठी 
 तसं देवाने मला चांगलच "बनवल" आहे  मी देव मानतो
पण मी प्रयत्नवादी आहे. "  

                          "ज्याला आपली मत मांडता येत नाही त्याला मत असून नसून सारखीच!!! 
आपली मत मांडण्यापेक्षा दुसर्याला पटणारे विचार बोलायचे.
मग विषय संपतो विश्वासघात फक्त विश्वासू व्यक्तीच करू शकते.
स्वत:च्या अस्तित्वावर बेतल की, या जगात कोणी कोणाच नसत
एक माणूस म्हणून तुम्हाला सगळे गुन्हे माफ़.... पण माणूस असाल तर..."

                      " वादळ कधी परवानगीची वाट पाहत दारावर थांबत का?
 संसारात आपण कोणत्या व्यक्तिबरोबर संसार करतो आहे तिला महत्त्व द्यायला हव संसाराला नाही
 श्रद्घा प्रेम शिकवते आणि अंधश्रद्धा फक्त बळी मागते
 "निसर्गाला रंग हवा असतो, फुलानाही गंध हवा असतो,
माणूस हा एकटा राहणार कसा, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो !!!!!"
पण फसवणाऱ्या  व्यक्तिसाठी माझ्या आयुष्यात स्थान नाही
सोय पाहून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोयीतही सोय पहिली जाते ते प्रेम
हिशोब कळतो पण किम्मत कळत नाही"

                     मला गाने  म्हणायला आवडत पण मी गाने  म्हटलेल लोकांना आवडत नाही.
मला प्राणी आवडतात पण त्याना कैद करण आवडत नाही
प्रत्येकाला स्वातंत्र्य दिल जाव कारण पकडून पकडून मैत्री करायाला आवडत नाही.
 पण मैत्री केल्यावर पकडून ठेवायला आवडत "



                       जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होण शक्यच नाही.
आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेन कदाचित.... पण लढली जरुर आहे 
 "या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे...!!"
 आणि हेच जगणे आनंदी करणारी काही नाती माझ्या आयुष्यात महत्वाची आहेत.
 आयुष्यातील चांगुलपणावर विश्वास. खोटेपणा, वाईट वृत्ती, माणंस यांचा तिरस्कार..!!
नशीबावर विश्वास नाही.आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका.
 तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या "

                      मी कधीच कोणती गोष्ट अर्धवट सोडत नाही
 चांगल किंवा वाईट झाल तरी त्याच खर कारण शोधून काढतो
 मी माझा कोणताच निर्णय नियतिवर सोडत नाही..

मी उठायचो ती बसायची मी हसायचो ती रुसायची


मी उठायचो ती बसायची मी हसायचो ती रुसायची


मी उठायचो
ती बसायची
मी हसायचो
ती रुसायची
मी इंग्लिश ऐकायचो
ती मराठी गाणी ऐकायची
मी action पाहायचो
ती DDLJ मध्ये रमायची
मी perfume दिला तर
ती गजरा आन म्हणायची
गजरा हातात दिला तर
केसात माळ म्हणायची
माळता येत नाही म्हणालो की
माझ्यावर चिडायची
वैताग आहे नुसता म्हणालो कि
रड रड रडायची
रात्री मधेच उठून
ती चारोळीचा sms पाठवायची
आणि नेमका त्याच वेळेस
मला एकही ओळ नाही आठवायची
मी blank sms पाठवला कि
ती माझ्यावर जाम चिडायची
आणि मग दुसर्या दिवशी फोन न उचलून
मला दिवसभर पिडायची
त्या दिवशी मग मी
एकटा होऊन राहायचो
आली असेल तिची चारोळी
म्हणून सारखा फोन पाहायचो
दुसर्या दिवशी पहाटेच तिचा फोन
असे काही तरी घडायचे
चुकले रे माझे सख्या
असे म्हणून तिनेच परत रडायचे
अश्या रडा-रडीला
कारणांची कमी नसते
कोणत्या गोष्टीवरून होईल भांडण
याची कधी हमी नसते