Friday, November 19, 2010

उखाणे

उखाणे


*मंगळसुत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर,
---रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर


भाग्याचे कुन्कु प्रेमाचा आहेर
.........रावांच्या मिठित विसरते मी माहेर


*चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा ,----- नाव घेते सोडा माझी वाट


*नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात

*रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
..... चे नाव घेते असु द्या लक्षात.

*निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
*  आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
.........चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

*चान्दिच्या ताटात फणसाचे गरे...........राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

*पाव शेर रवा पाव शेर खवा
.......... चे नाव घेते हजार रुपये थेवा.

*भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात
..........च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात


* पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

* श्रीरामाने भोगिला चौदा वर्षाचा वनवास,
....चे नाव घेते सखींनो आता करू नका सासुरवास

* एक होती चिऊ एक होती काऊ…...
......रावांच नाव घेते , डोक नका खाऊ…

* आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ……
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ……
आणि ……. रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..

* इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर .................च नाव घेते ............... ची लव्हर

*द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान





*आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश




*नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात
----- चे नाव घेण्यास आजच केली सुरवात




*आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा




*लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे




*वन, टु, थ्री
.... चं नाव घेते मला करा फ़्री




*घरापुढे अंगण,
अंगणापुढे ओसरी,
ओसरीपुढे माजघर,
माजघरात फ़डताळ
फ़डताळात चांदीचा भगुला
भगुल्यात ठेवला खवा
.....राव आले घरला आता तुम्ही जावा.




*सायंकाळी तुळशीपाशी, मंद ज्योत तेवते
बारशाचा दिवस म्हणून ...चे नाव घेते


*कोकिळेच्या कुजनात वसंत ऋतू गेला झटकन
...चे नाव पाहा घेतले, की नाही पटकन


*आशीवार्दाची फुले वेचते वाकून
...चे नाव घेते तुमचा मान राखून


*साधी राहणी, उच्च विचारसरणी
याच तत्त्वाने वागेल ...ची गृहिणी


*भरल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
पंगत बसली ...रावांच्या मित्रांची


*शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात
...रावांचे नाव घेते सासरच्या घरात



*नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा
...रावांसह संसार करेन तुमच्या आशीर्वादाने सुखाचा


*चंद्राचं प्रतिबिंब, पडलं तळ्यात
...रावांचं नाव घेते मैत्रिणींच्या मेळ्यात


*नमस्कार करता येतो मला, छान वाकून
...चं नाव घेते तुमचा मान राखून


*शंकराला वाहिलं बेलाचं पान
...चं नाव घेते हं, ऐका देऊन कान


*गोकुळातील मेळाव्यात श्रीकृष्ण वाजवतो पावा
...सारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा



*कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!




*आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास


*आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
  
*निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान,
.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान


*सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
...रावाचे नाव घेते ...ची सुन

*हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
---रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी


*निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास



*शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने


*केलेीच पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना कस कस वाटत


*नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
...रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा


* एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा , कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु , गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब , कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ , माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ .


*नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा


*चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप
--- रावां समवेत ओलांडते माप


*बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस


*कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन
........नाव घेयला सुरवात केली आजपासून


*सूपभर सुपारी निवडू कशी,
गळ्यात माळ वाकु कशी,
पायात पैंजण चालू कशी,
........ बसले मित्रपाशी,
कपाटाची चावी मागू कशी..?


*काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून


*हिरव्या शालुला जरिचे काठ
चे नाव घेते, सोडा माझी वाट


*लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे



*सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न,
....च्या सोबत झाले आताच माझे लग्न

No comments: