Wednesday, April 27, 2011

भारतीय स्त्रियांच्या कुंकवाला फार महत्व आहे

भारतीय स्त्रियांच्या कुंकवाला फार महत्व आहे.........
भारतीय स्त्रियांच्या कुंकवाला फार महत्व आहे. पूर्वीच्या
काळी स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या. त्याच्यापाठीमागे काही शास्त्रीय कारण आहे. फक्त
स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील कपाळाला गंध
लावणे अपेक्षित आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया पिंजर
 लावायच्या. साधारणपणे लाल, चॉकलेटी किंवा मरून रंगाची पिंजर जास्त प्रमाणात
 वापरली जायची. पूर्वीच्या काळी स्त्रिया चंद्रकोर लावायच्या.

हिंदू धर्मात स्त्रीचं सौभाग्य कपाळावर लावलेल्या कुंकवामुळे समजतं. कोणत्याही

लग्न झालेल्या स्त्रीने कपाळावर कुंकू लावावं, असा अलिखित नियम आहे. हिंदू
धर्मात कपाळावर कुंकू, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र
हे तीन सौभाग्यालंकार मानतात.

हल्लीच्या सगळ्याच गोष्टींवर चित्रपट आणि सिरियल्सचा खूपच प्रभाव होत

चाललेला दिसतो. मग त्यातून टिकल्या कशा काय सुटतील? म्हणूनच आज
 असंख्य प्रकारांच्या, आकाराच्या, रंगाच्या लेटेस्ट फॅशनच्या फॅन्सी टिकल्या
 लावण्याचा स्त्रिया आणि तरुण मुलींमध्ये ओघ दिसून येतो.

अलीकडच्या फॅशनच्या युगात कपड्यांच्या लेटेस्ट स्टाइलमुळे नवीन लग्न

झालेल्या मुली टिकली लावत नाहीत. जीन्स, टी-शर्ट घातल्यावर टिकली
सूट होत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. पण जर लग्न समारंभात
साडीवर, शरारा अशा कपड्यांवर टिकलीशिवाय कोणत्याही
स्त्रीच्या सौंदर्याला उठाव येत नाही.

हल्ली प्रत्येक गोष्टींमध्ये फॅशनचा

 शिरकाव झाल्यामुळे, त्याच्या
नावाखाली अनेक नवीन-नवीन
 वस्तू बाजारात येत आहेत.
अशाच या फॅशनच्या युगात
ड्रेसवर किंवा साडीवर
लावण्यासाठी वेगवेगळ्या
प्रकारच्या, आकाराच्या
आणि रंगाच्या अनेक टिकल्याही
 बाजारात आल्या आहेत. काही
स्त्रिया अगदी छोटी टिकली लावतात,
काही कपाळभर मोठ्ठ कुंकू लावतात
 तर काही जणी पूर्ण मळवट भरतात
 अगदी ह्या काळातदेखील.

गेल्या काही वर्षांमध्ये सिरियल्समुळे बिंदीच्या क्षेत्रात खूप मोठी क्रांती

घडल्यासारखी वाटते. काही वर्षांपूर्वी सौभाग्यवती स्त्रिया कुंकवाचा
वापर करत असत. टिकल्या फक्त उत्तर भारतीय स्त्रिया प्रामुख्याने
 लावत. त्या ठराविक आकारात मिळत. त्यानंतर लिक्वीड फॉर्ममधील
कुंकू बाजारात आले. मग त्यात रंगसुध्दा आले. हल्ली त्याचा वापर
कालबाह्य झाला आहे. त्यानंतर मरून, लाल, काळ्या रंगाच्या
वेलवेटमधल्या टिकल्या मार्केटमध्ये आल्या.

चेह-यावरून हात फिरवल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे कुंकू

किंवा गंध पसरतं. पण तेच टिकली पडली की दुसरी लगेचच लावता येते.
 त्यामुळे टिकली हा प्रकार कुंकवाऐवजी फारच लोकप्रिय झाला.
पण गेल्या दोन-अडीच वर्षांपासून टिकल्यांमध्ये वेगवेगळे प्रकार,
डिझाइन्स, रंग, टिकल्यांची लांबी, उंची, तसेच वेगवेगळ्या रंगाचे
गंध यात फार मोठा बदल झाला आहे.

कोणत्याही समारंभात किंवा पाटीर्मध्ये पारंपरिक ड्रेसवर वेगवेगळया

प्रकारच्या टिकल्या लावलेल्या अनेक मुली दिसतात. 'ताल' चित्रपटामुळे
एकच पांढरा खडा अशी फॅशन आली.

जसजशी टिकल्यांची फॅशन येत गेली , तसतशी टिकली हे नाव मागे

पडलं आणि बिन्दी हे नाव रूढ झालं. त्याचबरोबर टिकल्या बनवण्याच्या
 पद्धतीमध्ये आणि त्याच्या मटेरियलमध्येही खूप फरक पडू लागला आहे.
 काळानुरूप विविध रंगाच्या, विविध आकाराच्या, विविध पद्धतीच्या
 वेलवेटच्या टिकल्या येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर टिकल्यांच्या
वेलवेटमुळे आणि चिकटण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोंदाचा काही
अपाय होऊ नये , म्हणून काळजी घेतली जाऊ लागली.

अनेक छोट्या कंपन्या या उत्पादनात उतरल्याचं आढळतं. आजकाल

वेलवेटशिवाय प्लॅस्टिक फॉर्ममध्ये कॉम्प्युटरवर टिकल्या तयार होऊ
 लागल्या आहेत. फॅन्सी टिकल्यांमध्ये सगळ्या रंगांबरोबर मणी, मोती,
खडे, कुंदन हे प्रकार आहेत. यामध्ये सिंगल खडा, डबल खडे, गोल खडा
लावलेला असतो. टिकल्यांच्या प्रकारांप्रमाणेच टिकल्यांचे असंख्य आकार
आहेत. त्यामुळे कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर किंवा साडीवर मॅचिंग टिकली
 लावू शकतो.

नववधूसाठीच्या खास प्रकारच्या फॅन्सी टिकल्या माकेर्टमध्ये असून ,

त्याची किंमत 100 ते 150 रुपयांपर्यंत आहे. नववधूप्रमाणेच नवरदेवासाठी
 अक्षता , खडे यांनी तयार केलेला टिळाही याच किंमतीमध्ये आहे.
पूर्वी लग्नामध्ये कुंकवाने किंवा गंधाने मळवट भरण्याची पद्धत होती;
पण हल्ली मळवट टिकली मिळते आणि तीही आपल्याला हव्या
त्या आकारांमध्ये.

काही प्लेन टिकल्यांमध्ये निळा ,

 जांभळा , हिरवा या रंगांच्या
 टिकल्या प्लेन साडीवर लावण्याची
फॅशन आहे. प्रत्येक मुलगी किंवा
स्त्री पाहिजे त्या आकाराची ,
 प्रकाराची आणि किंमतीची
टिकली खरेदी करू शकते. आजकाल
भांगामध्येसुद्धा टिकली लावण्याची
फॅशन आहे. यामध्ये झिगझॅग
आकाराची सिल्व्हर आणि गोल्डन
रंगाची टिकली जास्त चालते. याची
लांबी चार ते पाच इंच असते.
 लग्नामध्ये अनेक मुली अशा प्रकारच्या टिकल्या लावलेल्या दिसतात. अशा
या टिकल्यांच्या किंवा बिंदीजच्या दुनियेतील टिकल्या दोन रुपयांपासून
300-400 रुपयांपर्यंत आहे. किंमत कितीही असू देत; पण एखादी टिकली
आवडली की, ती टिकली महिला घेतातच. कारण टिकली किंवा बिंदी
हा स्त्रीचा सौभाग्याचा अलंकार आहे आणि त्यामुळे स्त्रीच्या
सौंदर्यात नक्कीच भर पडते.

Monday, April 25, 2011

मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दीसले ?

 
मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दीसले ?
 
मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दीसले ?
कोणासाठी हसावे कोणासाठी रडावे ,
 
मनातील दुःख कोणाला सांगावे
 कीतीदा मनातल्या मानत आपण बोलावे .
 
मनातल्या मनात खुप गोंधळ झालाया,
अशरुनी डोळ्यात महासागर बनलाय ,
 
हया जीवनाचा खुप कणटाळ आलय,
जग्नायाचा जणू आनादाच हरवून गेलाय.
 
ही दशा झाली आहे माझ्या मनाची
अता काळजी करू तरी कुणाची
 
आस आहे ती धावत येण्याची वाट पाहतोय त्या चार क्षण सुखाची .....................