सर्व विसिटर्स ना मानाचा मुजरा... खरा कधी बोलत नाय खोटा कधी सांगत नाय आपण पोपट नाय की पोल ऑक्टोपस नाय.... मराठी गडी.... हाय डोका कधी वापरत नाय सब मामला दिल का हाय... धोका खाल्ला तरी जिव लावल्या शिवाय रहात नाय एक नाय दोन नाय सांगण्या सारखे लई हाय त्यासाटीच हा ब्लॉग तयार केला हाय गल्ली पासून दिल्ली पर्यंत मुंशीपाल्टी पासून पार्लामेंट पर्यंत पडक्या वाड्या पासून लाल किल्ल्यापर्यंत रायगडा पासून व्हाया दिल्ली अटकेपार सर्वांना.....मानाचा मुजरा... !!!जय हिंद जय महाराष्ट्र!!!
Thursday, May 19, 2011
Wednesday, April 27, 2011
भारतीय स्त्रियांच्या कुंकवाला फार महत्व आहे
भारतीय स्त्रियांच्या कुंकवाला फार महत्व आहे......... काळी स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या. त्याच्यापाठीमागे काही शास्त्रीय कारण आहे. फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील कपाळाला गंध लावणे अपेक्षित आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया पिंजर लावायच्या. साधारणपणे लाल, चॉकलेटी किंवा मरून रंगाची पिंजर जास्त प्रमाणात वापरली जायची. पूर्वीच्या काळी स्त्रिया चंद्रकोर लावायच्या. हिंदू धर्मात स्त्रीचं सौभाग्य कपाळावर लावलेल्या कुंकवामुळे समजतं. कोणत्याही लग्न झालेल्या स्त्रीने कपाळावर कुंकू लावावं, असा अलिखित नियम आहे. हिंदू धर्मात कपाळावर कुंकू, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र हे तीन सौभाग्यालंकार मानतात. हल्लीच्या सगळ्याच गोष्टींवर चित्रपट आणि सिरियल्सचा खूपच प्रभाव होत चाललेला दिसतो. मग त्यातून टिकल्या कशा काय सुटतील? म्हणूनच आज असंख्य प्रकारांच्या, आकाराच्या, रंगाच्या लेटेस्ट फॅशनच्या फॅन्सी टिकल्या लावण्याचा स्त्रिया आणि तरुण मुलींमध्ये ओघ दिसून येतो. अलीकडच्या फॅशनच्या युगात कपड्यांच्या लेटेस्ट स्टाइलमुळे नवीन लग्न झालेल्या मुली टिकली लावत नाहीत. जीन्स, टी-शर्ट घातल्यावर टिकली सूट होत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. पण जर लग्न समारंभात साडीवर, शरारा अशा कपड्यांवर टिकलीशिवाय कोणत्याही स्त्रीच्या सौंदर्याला उठाव येत नाही. शिरकाव झाल्यामुळे, त्याच्या नावाखाली अनेक नवीन-नवीन वस्तू बाजारात येत आहेत. अशाच या फॅशनच्या युगात ड्रेसवर किंवा साडीवर लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या, आकाराच्या आणि रंगाच्या अनेक टिकल्याही बाजारात आल्या आहेत. काही स्त्रिया अगदी छोटी टिकली लावतात, काही कपाळभर मोठ्ठ कुंकू लावतात तर काही जणी पूर्ण मळवट भरतात अगदी ह्या काळातदेखील. गेल्या काही वर्षांमध्ये सिरियल्समुळे बिंदीच्या क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडल्यासारखी वाटते. काही वर्षांपूर्वी सौभाग्यवती स्त्रिया कुंकवाचा वापर करत असत. टिकल्या फक्त उत्तर भारतीय स्त्रिया प्रामुख्याने लावत. त्या ठराविक आकारात मिळत. त्यानंतर लिक्वीड फॉर्ममधील कुंकू बाजारात आले. मग त्यात रंगसुध्दा आले. हल्ली त्याचा वापर कालबाह्य झाला आहे. त्यानंतर मरून, लाल, काळ्या रंगाच्या वेलवेटमधल्या टिकल्या मार्केटमध्ये आल्या. चेह-यावरून हात फिरवल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे कुंकू किंवा गंध पसरतं. पण तेच टिकली पडली की दुसरी लगेचच लावता येते. त्यामुळे टिकली हा प्रकार कुंकवाऐवजी फारच लोकप्रिय झाला. पण गेल्या दोन-अडीच वर्षांपासून टिकल्यांमध्ये वेगवेगळे प्रकार, डिझाइन्स, रंग, टिकल्यांची लांबी, उंची, तसेच वेगवेगळ्या रंगाचे गंध यात फार मोठा बदल झाला आहे. कोणत्याही समारंभात किंवा पाटीर्मध्ये पारंपरिक ड्रेसवर वेगवेगळया प्रकारच्या टिकल्या लावलेल्या अनेक मुली दिसतात. 'ताल' चित्रपटामुळे एकच पांढरा खडा अशी फॅशन आली. जसजशी टिकल्यांची फॅशन येत गेली , तसतशी टिकली हे नाव मागे पडलं आणि बिन्दी हे नाव रूढ झालं. त्याचबरोबर टिकल्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये आणि त्याच्या मटेरियलमध्येही खूप फरक पडू लागला आहे. काळानुरूप विविध रंगाच्या, विविध आकाराच्या, विविध पद्धतीच्या वेलवेटच्या टिकल्या येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर टिकल्यांच्या वेलवेटमुळे आणि चिकटण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोंदाचा काही अपाय होऊ नये , म्हणून काळजी घेतली जाऊ लागली. अनेक छोट्या कंपन्या या उत्पादनात उतरल्याचं आढळतं. आजकाल वेलवेटशिवाय प्लॅस्टिक फॉर्ममध्ये कॉम्प्युटरवर टिकल्या तयार होऊ लागल्या आहेत. फॅन्सी टिकल्यांमध्ये सगळ्या रंगांबरोबर मणी, मोती, खडे, कुंदन हे प्रकार आहेत. यामध्ये सिंगल खडा, डबल खडे, गोल खडा लावलेला असतो. टिकल्यांच्या प्रकारांप्रमाणेच टिकल्यांचे असंख्य आकार आहेत. त्यामुळे कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर किंवा साडीवर मॅचिंग टिकली लावू शकतो. नववधूसाठीच्या खास प्रकारच्या फॅन्सी टिकल्या माकेर्टमध्ये असून , त्याची किंमत 100 ते 150 रुपयांपर्यंत आहे. नववधूप्रमाणेच नवरदेवासाठी अक्षता , खडे यांनी तयार केलेला टिळाही याच किंमतीमध्ये आहे. पूर्वी लग्नामध्ये कुंकवाने किंवा गंधाने मळवट भरण्याची पद्धत होती; पण हल्ली मळवट टिकली मिळते आणि तीही आपल्याला हव्या त्या आकारांमध्ये. जांभळा , हिरवा या रंगांच्या टिकल्या प्लेन साडीवर लावण्याची फॅशन आहे. प्रत्येक मुलगी किंवा स्त्री पाहिजे त्या आकाराची , प्रकाराची आणि किंमतीची टिकली खरेदी करू शकते. आजकाल भांगामध्येसुद्धा टिकली लावण्याची फॅशन आहे. यामध्ये झिगझॅग आकाराची सिल्व्हर आणि गोल्डन रंगाची टिकली जास्त चालते. याची लांबी चार ते पाच इंच असते. लग्नामध्ये अनेक मुली अशा प्रकारच्या टिकल्या लावलेल्या दिसतात. अशा या टिकल्यांच्या किंवा बिंदीजच्या दुनियेतील टिकल्या दोन रुपयांपासून 300-400 रुपयांपर्यंत आहे. किंमत कितीही असू देत; पण एखादी टिकली आवडली की, ती टिकली महिला घेतातच. कारण टिकली किंवा बिंदी हा स्त्रीचा सौभाग्याचा अलंकार आहे आणि त्यामुळे स्त्रीच्या सौंदर्यात नक्कीच भर पडते. |
Monday, April 25, 2011
मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दीसले ?
मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दीसले ?
मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दीसले ?
कोणासाठी हसावे कोणासाठी रडावे ,
कीतीदा मनातल्या मानत आपण बोलावे .
मनातल्या मनात खुप गोंधळ झालाया,
अशरुनी डोळ्यात महासागर बनलाय ,
हया जीवनाचा खुप कणटाळ आलय,
जग्नायाचा जणू आनादाच हरवून गेलाय.
ही दशा झाली आहे माझ्या मनाची
अता काळजी करू तरी कुणाची
आस आहे ती धावत येण्याची वाट पाहतोय त्या चार क्षण सुखाची .....................
Wednesday, March 9, 2011
खरच तुला माझा कंटाळा आला आहे का ?
खरच तुला माझा कंटाळा आला आहे का ?
मला माहित आहे तुला ONLINE
यायला वेळ मिळत नाही, मी मात्र
तू आली का येवून गेलीस ?ह्या विचारात
मला तुझे हाल हवालही कळत नाही
मी जेव्हा ONLINE येतो तेव्हा
तुला कदाचित येण्यास जमत नाही
किंवा तू आधीच येवून गेलेली असतेस
मला एकही कॉमेंट न देता OFFLINE झालेली असतेस
तुला ONLINEपाहता माझे मन
कशी आहेस ? विचारण्यास धडपडते
पण तू मात्र बिझी राहून, मला टाळून
इतरांशी गप्पा मारत राहते
माझे साधे स्क्रेप्स तुला कधीच
का आवडत नाही
आणि माझ्याकडे पैसे कमी आहेत म्हणून
महागडे गिफ्ट देणे मला परवडत नाही
कदाचित तुला हाय PROFILE
मित्रांशी गप्पा मारायच्या असतील
पण कदाचित त्यांच्या अश्लील शब्दांत
एक दिवस तू संकटात सापडशील !
मी चाट विनंती पाठवली की
तू कधीच स्वीकार करीत नाही
माझ्या भावना धुडकावून
दुखी मनाचा विचारच करत नाही
सखी भरपूर मित्र मिळव तू
पण त्यातले विश्वासू कोण ते तूच ठरव
चांगले मित्र फार भाग्याने मिळतात
आपल्या सुख दुखाचे खरे वाटेकरी ठरतात
तू सदा हसत राहावी
प्रत्येक्त क्षण तू आनंदात जगावी
ह्याचा विचार मी सदैव करतो
सखी देवाजवळ हीच प्रार्थना करतो
मी तुला नेट मैत्रीण म्हणून
कधीच पाहत नाही,
शेवटच्या श्वासापर्यंत माझी मैत्री असेन
हे घे वचन माझे जरी मी ह्या जगात असेन वा नसेन
खरच तुला माझा कंटाळा आला आहे का ?
कि नवीन मित्रांच्या शोधात तू रमलीस ?
हे सखी तसे मला सांग मी वाट पाहत आहे
का? अशी मला तुझ्या पासून दूर लोटत आहे
कदाचित भावनेच्या भरात , तुझ्या प्रेमात
चुकलो तर माफ कर ..........
मला माहित आहे तुला ONLINE
यायला वेळ मिळत नाही, मी मात्र
तू आली का येवून गेलीस ?ह्या विचारात
मला तुझे हाल हवालही कळत नाही
मी जेव्हा ONLINE येतो तेव्हा
तुला कदाचित येण्यास जमत नाही
किंवा तू आधीच येवून गेलेली असतेस
मला एकही कॉमेंट न देता OFFLINE झालेली असतेस
तुला ONLINEपाहता माझे मन
कशी आहेस ? विचारण्यास धडपडते
पण तू मात्र बिझी राहून, मला टाळून
इतरांशी गप्पा मारत राहते
माझे साधे स्क्रेप्स तुला कधीच
का आवडत नाही
आणि माझ्याकडे पैसे कमी आहेत म्हणून
महागडे गिफ्ट देणे मला परवडत नाही
कदाचित तुला हाय PROFILE
मित्रांशी गप्पा मारायच्या असतील
पण कदाचित त्यांच्या अश्लील शब्दांत
एक दिवस तू संकटात सापडशील !
मी चाट विनंती पाठवली की
तू कधीच स्वीकार करीत नाही
माझ्या भावना धुडकावून
दुखी मनाचा विचारच करत नाही
सखी भरपूर मित्र मिळव तू
पण त्यातले विश्वासू कोण ते तूच ठरव
चांगले मित्र फार भाग्याने मिळतात
आपल्या सुख दुखाचे खरे वाटेकरी ठरतात
तू सदा हसत राहावी
प्रत्येक्त क्षण तू आनंदात जगावी
ह्याचा विचार मी सदैव करतो
सखी देवाजवळ हीच प्रार्थना करतो
मी तुला नेट मैत्रीण म्हणून
कधीच पाहत नाही,
शेवटच्या श्वासापर्यंत माझी मैत्री असेन
हे घे वचन माझे जरी मी ह्या जगात असेन वा नसेन
खरच तुला माझा कंटाळा आला आहे का ?
कि नवीन मित्रांच्या शोधात तू रमलीस ?
हे सखी तसे मला सांग मी वाट पाहत आहे
का? अशी मला तुझ्या पासून दूर लोटत आहे
कदाचित भावनेच्या भरात , तुझ्या प्रेमात
चुकलो तर माफ कर ..........
Thursday, March 3, 2011
लग्नाच्या गाठी.........
लग्नाच्या गाठी.........
जन्मोजन्मीचं वैर काढत तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठीदेव स्वर्गात बांधत असतो
लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
लग्नानंतर राहत नाही
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.
मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो
...आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.
आपला नवरा बैल आहे
असं प्रत्येक बाईला वाटत असतं
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं
तो कधी कसा वागेल
ह्याची जरासुद्धा खात्री नसते
नको तेच नेमकं बोलून जाईल
जे बोलायचं त्याला कात्री असते.
मग जमेल तिथं, जमेल तेव्हा, जमेल तितकं
ती त्याला बोलत बसते
त्याच्या तेही डोक्यावरून जातं
पण ह्या नंदीबैलाची मान डोलत असते
त्याचा तो गबळा अवतार
तिला नीट्नेटकं राहयचं असतं
तिला चार दिवस सासूचे
त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं
लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो
ती तरी थोडी त्याच्यासारखी असेल
असं प्रत्यक्षात घडत नाही
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून
ती त्याच्या आकाशात उडत नाही
तो गच्चीत तिला घेऊन जातो
इंद्रधनुष्यावर चालायला
ती सोबत पापड कुरडया घेते
गच्चीत वाळत घालायला
त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते
प्रेमात रंगून, नशेत झिंगून
खूपसं जवळ, काहीसं लांबून
थोडीशी घाई, थोडसं थांबून
पौर्णिमेचा चंद्र त्याला
तिच्या केसात माळायचा असतो
..................आणि त्याच वेळेस तिला
मोरी धुवायची असतो.
आपली बायको म्हैस आहे
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.........
जन्मोजन्मीचं वैर काढत तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठीदेव स्वर्गात बांधत असतो
लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
लग्नानंतर राहत नाही
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.
मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो
...आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.
आपला नवरा बैल आहे
असं प्रत्येक बाईला वाटत असतं
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं
तो कधी कसा वागेल
ह्याची जरासुद्धा खात्री नसते
नको तेच नेमकं बोलून जाईल
जे बोलायचं त्याला कात्री असते.
मग जमेल तिथं, जमेल तेव्हा, जमेल तितकं
ती त्याला बोलत बसते
त्याच्या तेही डोक्यावरून जातं
पण ह्या नंदीबैलाची मान डोलत असते
त्याचा तो गबळा अवतार
तिला नीट्नेटकं राहयचं असतं
तिला चार दिवस सासूचे
त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं
लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो
ती तरी थोडी त्याच्यासारखी असेल
असं प्रत्यक्षात घडत नाही
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून
ती त्याच्या आकाशात उडत नाही
तो गच्चीत तिला घेऊन जातो
इंद्रधनुष्यावर चालायला
ती सोबत पापड कुरडया घेते
गच्चीत वाळत घालायला
त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते
प्रेमात रंगून, नशेत झिंगून
खूपसं जवळ, काहीसं लांबून
थोडीशी घाई, थोडसं थांबून
पौर्णिमेचा चंद्र त्याला
तिच्या केसात माळायचा असतो
..................आणि त्याच वेळेस तिला
मोरी धुवायची असतो.
आपली बायको म्हैस आहे
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.........
Wednesday, February 23, 2011
फॅशन.....
फॅशन......
प्रेम करुन लग्न करणं
आज जुनं झालंय
लग्नापूर्वी पोर काढ्णं
आज फॅशन झालंय
झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं
आज जुनं झालंय
कपड्यासाठी अंग उगड ठेवणं
आज फॅशन झालंय
बापापुढं पोरानं नम्र राहणं
आज जुनं झालंय
पोरासंगे बापानं बिअर पिणं
आज फॅशन झालंय
पोरीसंगे आईनं देवळात जाणं
आज जुनं झालंय
आईसंगे पोरीनं डिस्कोत जाणं
आज फॅशन झालंय
डोक्याचं सोडून कंबरेला बांधणं
आज जुनं झालंय
कंबरेच सोडुन डोक्याला बांधणं
आज फॅशन झालंय
जपप्यासाठी संस्कृती प्रयत्न करणं
आज जुनं झालंय
विरोधात संस्कृतीच्या बबाळ करणं
आज फॅशन झालंय
प्रेम करुन लग्न करणं
आज जुनं झालंय
लग्नापूर्वी पोर काढ्णं
आज फॅशन झालंय
झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं
आज जुनं झालंय
कपड्यासाठी अंग उगड ठेवणं
आज फॅशन झालंय
बापापुढं पोरानं नम्र राहणं
आज जुनं झालंय
पोरासंगे बापानं बिअर पिणं
आज फॅशन झालंय
पोरीसंगे आईनं देवळात जाणं
आज जुनं झालंय
आईसंगे पोरीनं डिस्कोत जाणं
आज फॅशन झालंय
डोक्याचं सोडून कंबरेला बांधणं
आज जुनं झालंय
कंबरेच सोडुन डोक्याला बांधणं
आज फॅशन झालंय
जपप्यासाठी संस्कृती प्रयत्न करणं
आज जुनं झालंय
विरोधात संस्कृतीच्या बबाळ करणं
आज फॅशन झालंय
Monday, February 7, 2011
माझी....लाडकी मैत्रिण............
माझी....लाडकी मैत्रिण............
तशी ती स्वभावाने अबोलच,स्व:तामध्ये रमणारी,सांगण्या सारखं खुप असायचं तिच्याकडे, पण डोळ्यातुनच बोलणारी.मी अगदीच विरुद्ध,सतत बडबड करायचो,तू अगदी "टू मच" आहेस हे ऐंके पर्यंत पिडायचो.तसेही तिला पिडल्या शिवाय मला तरी कुठे चैन पडायची.मग तिला हसवण्यासाठीच माझी मिमिक्री असायची.कारण ती माझी....... लाडकी मैत्रिण होती.
तिला काही हवं असल की अगदी हक्काने मागायची..काय काय शोधुन हवे याची एक मोठी यादीच मिळायची.....कधी एखादे गाणे तर त्यात कधी कविता असायची...थोडा जरी शोधायला उशीर झाला की मात्र लगेच रुसायची...ती होती गाण्यांची दिवानी..तिला आवडायची...सगळी सुंदर गाणी....मी देखील मग फक्त तिच्या साठी सगळी शोधाशोध करायचो....मला नव्हती गाण्यांची आवड....तरी तिच्या साठी फक्त ऐंकायचो...कधी मित्रा कडून मिळव..तरी कधी दुकानात जावून तिच्यासाठी सिडिस घ्यायचो...मग ती जेव्हा गोड हसुन "थॅक्स" म्हणायची, तेव्हा ती खुपच छान वाटायची....कारण ती माझी.....लाडकी मैत्रिण होती.....
तसा मी खुप समजुतदार,पण तिच्यासमोर वेंधळ्यासारखा वागायचो..सांगायचे काही वेगळेच असायचे,पण काही वेगळेच बोलायचो....मग मात्र ती खुप खुप चिडायची..तू काय मुर्ख आहेस का?असे सुद्धा म्हणायची.तिच्या नाकावर कधी कधी खुप राग असायचा,कधी शब्दातून नाही दिसला तरी,तो तिच्या अबोल्यातून कळायचा.अश्या वेळी ती खुप खुप गप्प असायची,मी एकटाच "हाय" करायचो तरीही नाही बोलायची.मी मात्र सगळ काही हसण्या वरती न्यायचो...तिच्या समोर जरी वेधळा असलो तरी, तेव्हा मात्र समजुतदार व्हायचो.तिलाच माझी नंतर थोडी थोडी दया यायची,मग ती हळूच हसायची....तिची कळी खुललेली पाहून,माझी मुद्रा ही खुलायची...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.
एक दिवस का कुणास ठाऊक कसे आक्रीत घडले...नियतिच्या मनात काही वेगळेच असते, हे त्या दिवशी कळले.सांगायचे होते काय? आणि प्रकरण भलतीकडे वळले.....माझ्या ही डोक्यात त्या दिवशी भरपुर राग गेला...शस्त्रांनी जितक्या जखमा केल्या नसतील..तितक्या दोघानाही शब्दानी झाल्या.देवाला ठाऊक असेल फक्त,कोणी कोणाला हर्ट केले,पण एक मात्र नक्की, तिचेमाझे भांडण झाले.मैत्री पेक्षा तिचे माझे इगो मोठे झाले,शेवटी एकमेकाशी न बोलायचे ठरले अन दोघांचे जीव शांत झाले.मी मात्र आज ही तिला खुप मिस करतो,आता ती कशी असेल,याचा सुद्धा विचार करतो. तिच्या काळजीने आज ही जीव तितकाच जळतो.कधी कधी तिच्याशी खुप बोलावेसे वाटते,आज काय घडले ते सगळे सांगावेसे वाटते.विचार येतो मनात,"ती तुला विसरली सुद्धा असेल,तू कोण हे देखील तिला आठवत नसेल."......फोन पर्यन्त हात जातो,पण मी रिसिव्हर खाली ठेवतो...आज नाही पण उद्या नक्किच बोलू असे मनात म्हणतो...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.
Subscribe to:
Posts (Atom)





