Saturday, October 22, 2011

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .........


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .........


 उटण्यांचा सुवास,बंबाचा धूर
फराळाची ताटं,दारावरची तोरणं
आधणाचं पाणी,फोडलेली चिरांटी
फटाक्यांचे आवाज,मातीचे किल्ले
किल्ल्यांवरचं पोपटी,कोवळं जंगल
नवे कोरे शिवाजीमहाराज !
नवे जुने मावळे, त्यातच मोटारी आणि
बोगद्यातून डोकावणार्‍या आगगाड्या सुद्धा...
सारवलेलं अंगण,अंगणातलं तुळशीवृंदावन,
समोर रेखलेली रंगीत रांगोळी,पणत्यांची आरास ,
दारात झुलणारे आकाशदिवे,
आणि नव्या कोर्‍या परकर पोलक्यातली मी...
पणत्यात तेवणार्‍या मंद वाती
राहिल्यात सातासमुद्रापलिकडे,
पण दिवाळी मनात जागते आहे... 
नाताळच्या बाजारात मी दिवाळीसाठी पणत्या शोधते
रंगीत,सुवासिक मेणबत्त्या आणून घरभर लावते.
दिवाळी पहाटेची सुरुवात मग
भारतातल्या 'फोन'ने होते.
हा दूरध्वनी ... दूर चा आवाज खूप जवळ आणतो
पापण्यांच्या कडा ओलावतो; इथल्या आणि तिथल्याही...
इथले सुह्रद मग फराळाला येतात,
चिवडा,करंज्या,शंकरपाळे खाताना
कुतुहलाने अनेक प्रश्न विचारतात.
उत्साहाची कळी मग पुन्हा उमलते, 
आणि मनातली रांगोळी घरभर उमटते... 
सर्वांना ही दिवाळी आणि येणारे नूतन वर्ष भरपूर आनंदाचे,
भरभराटीचे आणि आरोग्यपूर्ण जाओ ह्या शुभेच्छांच्या  .........

Friday, October 21, 2011

एका प्रियकराची लग्नानंतर ची प्रतिक्रिया ........


एका प्रियकराची लग्नानंतर ची प्रतिक्रिया ........


यायला परत हिचा फोन.......,
आणि पुन्हा तेच प्रश्न,
कुठे आहेस..?, कसा आहेस..?,
काय करतोssssssय ..,?
झाली का कामं..?
... कप्पाळ माझं...!
हिला समजत नाही का.., मी कधी गाडीवर असतो,
कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजते हिच्या प्रश्नांची रिंगटोन,
चायला, च्यायला परत हिचा फोन.......,




कुठे पाळून नाही जाणार, सयंकाळी येइल न घरी,
'तेव्हा विचारशीsssल जे विचारायचं ते...,
सारं काही सांगेल.
झालंsssssss.., रडा-रडी सुरु - , 'तू खुप बदललाय,
लग्न आगोदर असा नव्हातास, माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.
अगं, ' तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोकनार कोण.?,
च्यायला परत हिचा फोन.......,




बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, ---- यू आणि काय काय..,
SMS पाठवला, भावना पोहोचल्या मग फोन चे काय काम,
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्यानी ओरडतोच,
मग बसते धारण करून मौन,
च्यायला परत हिचा फोन.......,




अगं किती प्रेम करशील, कधी कधी मलाच वाटत मीच तुझ्या लायकीचा नाही....

Saturday, October 1, 2011

किती क्षणाचं आयुष्य असतं!

किती क्षणाचं आयुष्य असतं!........




किती क्षणाचं आयुष्य असतं!
..
आज असतं तर उद्या नसत म्हणूनच



ते हसत हसत जगायचं असतं!

कारण इथं कुणी कुणाचं नसतं!


जाणारे दिवस जात असतात!


येणारे दिवस येतच असतात.


जाणारांना जपायचं असतं.


येणारांना घडवायचं असतं.


आणि


जीवनाचं गणित सोडवायचं असतं...