Wednesday, December 22, 2010

काही नाती


काही नाती मिरवायची असतात; मेडलसारखी

काही दाखवायची असतात; दातांसारखी

काही नाती भोगायची असतात; सम्राटासारखी
...

काही नाती वाहायची असतात; ओझ्यांसारखी

काही नाती ओळखायची असतात; गुपितांसारखी

काही समजून घ्यायची असतात; प्रेमासारखी

काही नाती जोडायची असतात; धाग्यांसारखी

काही पेलायची असतात; गोवर्धनासारखी

नातीगोती हातात नसतात; नशिबासारखी

म्हणूनच काही नाती विसरायची असतात; दुःखासारखी

No comments: