Wednesday, October 27, 2010

लई भारी .............

लई भारी .............

*शिक्षक : एक भिंत बांधायला १०००० रुपये खर्च येतो तर २ भिंती बांधायला किती खर्च येईल?

विद्यार्थी : १०० करोड.

शिक्षक : नालायक, तुझ्या बापाच नाव काय?
...
...
विद्यार्थी : सुरेश कलमाडी



*गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
पत्नी : कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?...
गोपाळराव : तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात ...अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.


*मंग्या, आयटम बरोबर 'रंगात' आला होता, अचानक आयटम बोलली, माझ्याशी लग्न करशील? मला बायको बनवशील?
मंग्या ( वैतागून ) : कामगार आहेस तर मेहनत कर, कंपनीची मालकीण बनण्याचा विचार करू नकोस..

*शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास
ठेवला, पण गाढव पाणीच प्यायला, तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?

चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो.

*वडील : अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान, दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो...

मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!!

* एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??
...

* ‎'शृंगाराच्या' वेळी संताची आयटम सारखी सारखी त्याला विचारात होती

"सांगा न तुझं खरच माझ्यावर प्रेम आहे ना?"
शेवटी वैतागून संता म्हणाला,
...
"आयच्या गावात, मग तुला काय वाटल मी काय पुश अप्स मारतोय... "

* कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,

...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.

*तुम्ही तिच्यावर प्रेम करता..
पण दुर्दैवाने लग्न दुसरीशी होत..
जिच्याशी लग्न करता ती तुमची बायको होते.....
...
आणि जिच्यावर तुम्ही प्रेम करत होतात ती......

तुमच्या Email चा password होते....

*ती कॉलेज मध्ये दिसली कि
कॉलेज अगदी विधानसभेसारखं वाटतं,
आणि एकदा जरी बघुन हसली तर मला
बिनविरोध निवडलेल्या आमदारासारख वाटतं.

* बबली (लाडात) : तू माझा होशील काय ?

पक्या : नाही...
...
बबली : का ??????????.

पक्या : मी "माझा" झालो तर तू मला पिऊन टाकशील...

* मंग्या, चिंगी बरोबर बागेत बसला होता, समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता....

मंग्या (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण.....
चिंगी : ठीक आहे, माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे.......

* दारू मुले आयुष्य उध्वस्त झालेल्या बेवड्याला बियर च्या बाटल्यांचा खच दिसला..
१ बाटली फोडून तो म्हणाला, तुज्यामुळे माझी बायको मला सोडून गेली...
२ बाटली फोडून तो म्हणाला, तुज्यामुळे माझा जॉब गेला...
३ री बाटली फोडण्यासाठी उचलली ती भरलेली होती, ती पिशवीत ठेवत तो म्हणाला, तुझा काही दोष नाही, तू चल घरी...

* मंग्या : मी जर तुला कीस केला आणि पळून गेलो तर तुझ्या मनात पहिल्यांदा कोणता विचार येईल?

चिंगी : एक मूर्ख, जो सगळा पेपर लिहू शकत असताना फक्त रिकाम्या जागा भरून पळून गेला!!!

No comments: