Friday, October 29, 2010

अहो.. कुठे चालले ?

अहो.. कुठे चालले ?

आपल्याला माहिती आहे कि कोलंबस ने अमेरिकेचा शोध लावला .
जेव्हा त्याने हा शोध लावला तेव्हा तो अविवाहित होता.
अमेरिका शोधायच्या आधीच जर त्याचे लग्न झाले असते तर त्याला घरून कितीतरी
प्रश्नांचा सामना करावा लागला असता .

अहो.. कुठे चालले ?
कोणासोबत ?
का ?
कसे जाणार आहात ?
काय शोधायला चालले ?
तुम्हीच का ?
तुम्ही गेले तर मी इथे काय करू ?
मी तुमच्यासोबत येऊ ?
परत कधी येणार आहात ?
रात्री चे जेवण घरीच करणार आहात का ?
माझ्या साठी काय आणणार आहात ?
तुम्ही मुद्दामच चालले आहात
बरोबर आहे ना ?
खोटं नका बोलू आता ..
असले कार्यक्रम कशाला बनवता ?
आजकाल तुमचं हे असं खूप चाललाय
का ?
मी माहेरी जाते ..
चला आणि मला माहेरी सोडून द्या
मला वापस नाही यायचं आता
तुम्ही मला थांबवतहि नाही आहात
मला कळत नाही कि हा शोध लावणे म्हणजे काय करतात
अहो ... मी काय म्हणतेय ...
तुम्ही नेहमीच असे करता ...
अजून काय शोध लावायचा राहिलाय ?

लग्न नाही केलं त्यांनी ... वाचला बिचारा ... :)

No comments: