Friday, October 29, 2010

~~ मैत्री ~~

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!



आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.

पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

विश्वासाची काठी, विवेकाची वाटी, अभ्यासाची पाटी, प्रयत्नांच्या गाठी,
हिच खरी जिवनाची गोडी. उभारुया यशाची गुडी.
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
एक तरी मैत्रीण असावी,
जिच्या मैत्रीत विश्वास
रुजावा.
तुमचासुद्धा खांदा कधी तरी
,

तिच्या दुःखाने भिजावा.

बाप्पा आले;
झाला आनंद सगळ्यांना
सुरुवात केली शुभ
कार्याला
म्हणा
गणपती बाप्पा मोरया!

आपट्याची पाने जुळवतात मने
दस-याच्या प्रेमळ
शुभेच्छा
पाठवल्यायत गोड मनाने
स्विकार व्हावा त्याच्या मोठ्या
मनाने.
दस-याच्या शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा दसरा सण आला.
विनंती
आमची परमेश्वराला,
सौख्य
, समृध्दी लाभो तुम्हाला.
विजयादशमीच्या शुभेच्छा!
शब्दांनाही कोडं पडावं अशी काही गोड माणसं असतात;
केवढं
आपलं भाग्य असते जेव्हा ती आपली असतात.

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत सदा नवी दिशा
असावी,
घरटयाचे काय आहे
?
बांधता येईल केव्हाही
,
क्षितिजाच्याही पलीकडे झेप
झेण्याची जिद्द असावी.

मोहाच्या निसटत्या क्षणी परावृत्त करते ती मैत्री,
जीवनाच्या कडुगोड क्षणांना निःशब्द करते ती मैत्री
,
जीवनाच्या
अंतापर्यंत प्रत्येक पावलाला साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते ती
मैत्री…

गोडी-गुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा
रागवा,
नको अंतर कधी
, नको कधी दूरावा,
पावसाला लाजवेल ईतका
असू दे मैत्री
मध्ये जिव्हाळा.

अफाट पसरलेल्या या जगात, आपलं म्हणुन कोणी असतं.
सुख
दुःख जाणायला,
हक्काचं माणूस असतं.
भरकटलेल्या पावलांना
, दिशा देणारं कोणी
असतं.
आपल्यावरच्या त्याच्या या प्रेमालाच मैत्री हे नाव
असतं.

शब्द अंतरीचे असतात, मात्र दोष जिभेला मिळतात.
मन
स्वतःचे असते,
मात्र झुरावे दुसऱ्यासाठी लागते.
ठेच पायाला लागते
,

मात्र
वेदना मनाला होतात, डोळ्यांना रडावे लागते.
हेच खरे मैत्रीचे नाते असते.

आपण चढाओढ या शब्दाचा आशय
फार चुकीचा घेतो…

एखादा
आयुष्यात वर जायला लागला की
झटकन खाली ओढतो!

तुझी आणि माझी मैत्री एक गाठ असावी,
कुठल्याही मतभेदाला वाट नसावी.
मी आनंदात असताना हास्य तुझे असावे,
तू दुःखात असताना अश्रु माझे असावेत.
मी एकाकी असताना सोबत तुझी असावी,
तू मुक असताना शब्द माझे असावेत.

मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे,
त्याची कितीही जाळी झाली,
तरी ते पान
जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपुन ठेवायला हवे.

जे जोडेल ते नाते,
जाते ती सवय,
थांबते ती ओढ,
तर जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो सहवास,
निरंतर राहातात त्या आठवणी.

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण,
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो कारण
ही नाती तुटत नाहीत ती आपोआप मिटून जातात
जशी बोटावर रंग ठेवुन, फुलपाखरे हातुन सुटून जातात.

जिथे बोलण्यासाठी “शब्दांची” गरज नसते,
आनंद दाखवायलाहास्याची” गरज नसते,
दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,
न बोलताच सारे समजते, ती म्हणजे “मैत्री”.

पाण्याचा एक थेंब”
जर तो तव्यावर पडला
तर त्याचा अस्तित्वच संपतं,
जर तो कमळाच्या पनावर पडला
तर तो मोत्यासारखा चमकतॊ,
आणि, जर शिंपल्यात पडला तर तो मोतीच होतो.
पाण्याचा थेंब तोच, फरक फक्त सहवासाचा…

काही नाती तुटत नसतात
ती नकळत मनात घर करुन जातात,
जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरू हातून सुटून जातात.

काही नाती बांधलेली असतात,
ती सगळीच खरी नसतात,
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपूनही पोकळ राहतात.
काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचीत तयालाच मैत्री म्हणतात.

~~ मैत्री ~~
भावनांची कधी शांत तर कधी उसळती लाट,
की हृदयांना सांधणारी जणू एक वहिवाट,
मैत्री असावी शिशिरातल्या धुक्यासारखी दाट कारण
ती असते दोन जीवांची बांधलेली एक नाजूक “रेशिमगाठ”

एवढयाशा आयुष्यात खुप काही हवं असतं,
पण हवं असतं तेच मिळत नसतं,
हवं तेच मिळाल तरी खुप काही कमी असतं,
चांदण्यांनी भरुनसुद्धा आपलं आभाळ रिकाम असतं.

No comments: