Friday, October 29, 2010

… अशीही उत्तरे

…. थोडक्यात उत्तरे लिहा ….

प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.
प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर – हप्तावसूली.
प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर – ओला होईल.
प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर – अभिषेक.
प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ?
उत्तर – चार.
………………………………………………….
प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा ?
उत्तर – जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर,
एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या
मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना
मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते.

. …. अपूर्ण वाक्ये पूर्ण करा. ….

प्रश्न – पुरुष मोर्च्याचा नारा – हम सब ……………
उत्तर – नालायक है.
प्रश्न – महिला मोर्च्याचा नारा – हमारी मांगे …………
उत्तर – भरा करो.

१) महागाईची व्याख्या करा ….
उत्तर – ज्या गायी शरीराने महाकाय असून जास्त
चारा खावून कमी दुध देतात त्यांना
महागाई म्हणतात.
२) इंग्रजी अनुवाद करा.. वीज गेली तर गेलीच गेली.
उत्तर – इलेक्ट्रिक वेंट तर वेंटच वेंट.

No comments: