Thursday, November 18, 2010

तुमचा लॅपटॉप चोरीला जाण्यापासून वाचवा...................

तुमचा लॅपटॉप चोरीला जाण्यापासून वाचवा...................

मित्रांनो तुम्ही डेस्कटॉप वापरता की लॅपटॉप?  जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर ही पोस्ट वाचणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. हल्ली मोबईल नंतर कशाची जर जास्त चोरी होत असेल तर ती लॅपटॉपची. चोरीला जाण्याची काही ठिकाणे गाडी, ऑफिस, कॉफीशॉप, ग्रंथालयं, क्रॉसवर्ड सारखी दुकाने, थियेटर्स, शॉपींगमॉल व काहींचे तर चक्क घरातूनही चोरीला गेलेत. खिशातला मोबाईल जर चोरीला जाऊ शकतो तर टेबलवर ठेवलेला लॅपटॉप चोरी जायला फारसा वेळ लागत नाही. २/३ मिनिटांसाठी जरी तुम्ही लॅपटॉप समोरून हललात. तर मग देवसुद्धा तुमच्या लाड्क्याची काळजी घ्यायला असमर्थ असतो.
अशा भीतीमुळेच आपल्याला अगदी बाथरूमला जरी जायचे असेल तरी हे ओझे खांद्याला लटकावूनच जावे लागते. कधी कधी( नव्हे…बरेच वेळा) ह्यामुळे प्रचंड गैसोयही होते. पण नवीन लॅपटॉपच्या किमती बघितल्या तर ही गैरसोय आपण नाईलाजाने सहन करत करतो.
पण आता इथून पुढे त्याची गरज नाही. आता तुम्हाला ही गैरसोय झटकता येणार आहे. लॅपटॉपच्या बाबतीत जिथे प्रत्यक्ष देवावरसुद्धा आपण विश्वास ठेवू शकत नव्हतो तिथे आता आपल्या लॅपटॉपच्या संरक्षणासाठी एक छोटासा प्रोग्राम् आपली मदत करणार आहे. आणी ज्यावर विसंबून तुम्ही अगदी कुठेही जाऊ शकता..बोले तो एकदम बिन्धास….आणी तो प्रोग्राम् आहे १ MB पेक्षाही छोटा. आणी तोही चक्क फुकट…
आता तुम्हाला प्रश्न पडला असणार काय आहे हा प्रोग्राम्?.,.आणी कसे वाचवणार तो आमच्या लाड्क्याला चोरीला जाण्यापासून? तर सांगतो…
मित्रानो हल्ली घराला थेफ्ट अलार्म लावतात ते तुम्हाला माहित आहे का? जाउन्द्या आपल्या इथे ही कन्सेप्ट अजून तेवढी रुळली नाहीये म्हणून दुसरे एक कॉमन उदाहरण घेतो. आजकाल रस्त्यांवर खूप इम्पोर्टेड गाड्या बघायला मिळतात (तुमच्याकडेदेखील असेल एखादी? नाहीये…असूंद्या येईल एक दिवस.  )ह्या गाड्यांना एक अलार्म सिस्टीम असते जर का कोणी गाडीला काहीही कराण्याचा प्रयत्न केला (अगदी नुसता स्पर्श जरी केला) तर एक कर्कश्य आवाज वाजायला सुरवात होतो. तोच हा थेफ्ट अलार्म. ह्याचा अनुभव आपण घेतलाच असाल? बरोबर ना?
अगदी सेम थीमवर आपला हा लॅपटॉप अलार्म प्रोग्राम काम करतो. एकदा का त्याला तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केले व त्याच्या सेटींग्स तुमच्या गरजेनुसार सेट केल्या की झाले. बस. आता त्याला चक्क विसरून जायचे. तो तुम्हाला त्याची आठवण तेंव्हाच करून देणार जेंव्हा तुमच्या लाडक्या लॅपटॉपवर काहीतरी संकट येईल…बरं ही आठवणही तो अगदी कर्कष्यपणे करून देणार…की जेणेकरून तुम्ही कुठेही असाल तरी धावत लॅपटॉपजवळ याल.
आता आपण या लॅपटॉप अलार्मची वैशिष्टे बघूया…म्हणजे हा काय काय करू शकतो ते बघूया.
१. थेफ्ट अलार्म – जर कोणी तुमचा लॅपटॉप चोरत असेल तर एक मोठा अलार्म वाजून हा तुम्हाला खबरदार करतो.( तुमची AC केबल चार्जिंगपासून डिसकनेक्ट केली असता वा लॅपटॉप शटडाउन केला असता.)
२. परिमिती अलार्म – जर तुम्ही ठरवून दिलेल्या परीमितीच्या बाहेर जर तुमचा लॅपटॉप जात असेल तर पुन्हा मोठा अलार्म.
३. दुर्लक्ष अलार्म – जर तुम्ही एखाद्या धोकादायक ठिकाणी तुमचा लॅपटॉप जास्त वेळ दुर्लक्षित ठेवला तर तो तुम्हाला अलार्म वाजवून त्याची जाणीव करून देतो.
४. बॅटरी अलार्म – बॅटरीवर अतिरिक्त ताण पडत असेल,किंवा बॅटरी लेवल कमी झाली असेल,किंवा अचानक येणाऱ्या जाणाऱ्या विजेमुळे जें नुकसान होवू शकते त्याची वेळीच अलार्म वाजवून कल्पना देतो.
५. डिस्क अलार्म – जर तुमची हार्डडिस्क खराब झाली असेल तर डाटा लॉस पासून वाचण्याकरिता किंवा लॅपटॉप ऐनवेळी बंद पडणे टाळतो…
६. डाटा नाश करणे – जर तुमचा लॅपटॉप चोरीला गेलाच तर त्यातील संवेदनशील डाटा हा नाहीसा करतो व त्याचा दुरुपयोग होण्यापासून वाचवितो.
७. चोरीला गेलेल्या लॅपटॉपमधील डाटा परत मिळवण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.
८. वर दिलेल्या पैकी काहीही झाले… तर एखाद्या गुणी बाळासारखा लगेच तुम्हाला इमेल वा SMS करून खबर देतो.
९. शिवाय तुम्ही याला अगोदरच पढवून ठेवू शकता की जर लॅपटॉप चोरीला गेलाच तर ह्याने पुढे काय काय करायचे…
तर असा हा अतिशय उपयुक्त प्रोग्राम खरे तर मित्रच म्हणलं पाहिजे याला..असलाच पाहिजे तुमच्या लाडक्या लॅपटॉपमध्ये…
माझा तर आहेच…तुम्ही कधी बनवताय याला तुमचा व तुमच्या लॅपटॉपचा मित्र?
लॅपटॉप अलार्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

No comments: