Wednesday, November 17, 2010

नॉनव्हेज खाण्यासाठी पुणे...

नॉनव्हेज खाण्यासाठी पुणे...


१. सुगरण्स कोल्हापुरी - पुणे-३०
झक्कास कोल्हापुरी थाळी मिळण्याचे ठिकाण.
मटण्/चिकन सोबत तांबडा पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी एकदम टकाटक चव Smile
पत्ता: सदाशिवपेठेत, भरत नाट्य मंदीरावरुन टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदीराकडे येताना लागणार्‍या शेडगेवाडीत हे सुगरण्स कोल्हापुरी आहे.

२. आवारे लंच होम - पुणे ३०
चिकन/मटण थाळी.
सन १९०१ पासुन सातत्याने गर्दी खेचणारी ही मांसाहारी खानावळ केवळ अप्रतिम चवीचे चिकन मटण देते. एका हाताने नाक डोळे पुसत आणि दुसर्‍या हाताने रस्सा भुरकत जेवण्याची इथली मजा औरच.
पत्ता: अलका टॉकिजच्या चौकातून कुमठेकर रस्त्यावर आल्यानंतर काहीसं पुढे येऊन उजव्या हाताला पहात जावं, कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या पुढे आल्यावर ताबडतोब दिसेल, जोंधळे चौक

३. निसर्ग [मासे]
पत्ता: कर्वे रस्त्यावर नळस्टॉप ला डावीकडे वळाल्यावर एक सर्कल लागते तिथे उजव्या हाताला

४. गोमंतक
पत्ता: डेक्कन जिमखाना परिसर. पुनम हॉटेल च्या लगतच्या (उजव्या हाताला) इमारती मधे एकदम वरच्या मजल्यावर

५. मालवण समुद्र [मासे]
मोरी मसाला आणि भरलेले पापलेट.
पत्ता: पिंपरी चिंचवड नाट्यगृहाच्या शेजारी. चिंचवड टेल्को समोर. (टाटा मोटर्स)

६. हॉटेल आशिर्वाद, पुणे
मासे आणि कोळंबी थाळी साठी चांगलेच प्रसिद्ध आहे.
पत्ता: डेक्कन वरुन कुमठेकर रस्त्यावर या. सिटि प्राईड शुजच्या चौकात उजवीकडे वळा. उजवीकडची दुसरी इमारत.
गुरुवार बंद.

७. स्वराज्य
मालवणी जेवण खासच
पत्ता: टिळक रोड वरून, एसपी कॉलेजच्या चौकात, निलायम टॉकीजच्या दिशेने वळा.
निलायम टॉकीजच्या चौकात कुणालाही विचारा.

८. जनसेवा

९. जयश्री

१०. दुर्गा [बिर्याणि]
पत्ता: टिळक स्मारक मंदिरासमोरच्या बोळात आणि दुसरे मंडईत आहे कुठेतरी

११. कलकत्ता बोर्डिंग हाउस [मासे]
पत्ता: जंगली महाराज रस्ता
१२. कलिंगा [मासे]
मत्स्यावतारांसाठी बेष्ट... लाल करी अप्पम किंवा नीर डोसा याबरोबर झकास लागते.
पत्ता: नळस्टॉप चौकाच्या मागच्या बाजूला, जुने टेक महिंद्रा - शारदा सेंटर च्या समोर किंवा नवीन पर्सिस्टंट च्या बाजूला.

१३. हॉटेल सौंदर्य
मटण केशरी बिर्याणी
पुणेरी मटण (पुणेरी मटण म्हणजे गावरान हिरवे मटण. लाल तिखटाऐवजी मिरची आणि इतर हिरव्या पदार्थांचा वापर करून हे मटण तयार केले जाते. हिरवी मिरची, ओला नारळ, खसखस, धने व तीळ यापासून तयार केलेल्या मसाल्याच्या जोडीला कोथिंबीर व पुदिना यांचे वाटण वापरले जाते. लाल तिखट कमी आणि सांगितले तर तेलाचा वापरही कमी, या गोष्टी ध्यानात ठेवून हे मटण घरगुती पद्धतीने तयार करतात. )
पत्ता: डेक्कनवर रानडे इन्स्टिट्युट समोर
ओरिजिनल, लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावरील

१४. हॉटेल सर्जा [हे लता मंगेशकरांचे आहे.]
चिकन थाई, चिकन मंगोलियन, चिकन कॅश्‍यू, चिकन व्होल्कॅनो, "प्रॉन्स विथ मिक्‍स व्हेजिटेबल्स हॉंगकॉंग स्टाईल', गोल्डन फ्राईड फिश, पुदीन मच्छी, फिश अमृतसरी, बोल्हाईच्या मटणाचे चायनीज पद्धतीने केलेले पदार्थ व कबाबच्या पंचवीसहून अधिक "व्हरायटी' येथे आहेत.
"स्टार्टर्स'मध्ये "फिश तवा' अनेकांना आवडतो. तव्यावर करीमध्ये मासा टाकून ती करी माशामध्ये पूर्णपणे मिसळून तवा कोरडा होईपर्यंत मासा शिजवितात.
(औंधसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये असल्यामुळे येथील पदार्थांचे दर साहजिकपणे इतर ठिकाणपेक्षा थोडे अधिक आहेत)
पत्ता: "सर्जा रेस्तरॉं', 127-2 सानेवाडी, आयटीआय रस्ता, औंध,पुणे - 411007

१५. समुद्रा रेस्तरॉं
गोवन तसेच मालवणी पद्धतीने बनविलेले मासे व कोल्हापुरी पद्धतीने बनविलेले पदार्थ.
मत्स्यप्रेमींसाठी इथे गोवन आणि मालवणी अशा दोन्ही पद्धतीने तयार केलेले मासे.
फिश प्लॅटर
फिश करी
खिमा गोली पुलाव
पत्ता: म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे - 411052. 09422943742 (म्हात्रे पूल संपला, की डावीकडे वळून डीपी रोड)

१६. वाघोली गावातील हॉटेल कावेरी
बोल्हाईचे मटण
पत्ता: एकूण पाच शाखा आहेत. मार्केट यार्ड (कृषी उद्योग भवन), पुणे-सोलापूर रस्ता (शेवाळेवाडी), कोथरूड (चांदणी चौक), देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग (बालेवाडी जकात नाक्‍याजवळ) येथेही "कावेरी'चे बस्तान बसले आहे.

१७. दोराबजी अँड सन्स
इथे चिकन बिर्याणी जबरा
दालगोश, चिकन किंवा मटण सालीगोश, मटण किंवा चिकन धनसाक, पात्रा फिश, शामी कबाब आणि "कस्टर्ड' हे पारशी पदार्थ
पत्ता: वेस्ट साइड शेजारचं आणि जुनं इस्ट स्ट्रीट वरचं
845, दस्तूर मेहेर मार्ग, सरबतवाला चौकाजवळ, पुणे 411001. 020-26145955, 020-26834595
१८. सिगरी रेस्तरॉ
कबाब, उत्तर भारतीय पदार्थ- अमृतसरी मछली, दक्षिणी मुर्ग, बुऱ्हा कबाब, रान-ए-सिगरी यांच्यासह जवळपास पंधरा "नॉनव्हेज' कबाब
पत्ता: "सिटी टॉवर्स' इमारत, ढोले-पाटील रस्ता,पुणे - 411001.
वेळ- सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० आणि सायंकाळी ७.३० ते रात्री ११

१९. "बोरावकेज बिर्याणी हाउस'
पाया सूप, मटण दालचा व राइस, चिकन खिचडा, चिकन दम बिर्याणी, रमजान स्पेशल चिकन, खिचडा, व्हाइट गोश, जंगबादी गोश, चिकन-मटण हंडी, चिकन-मटण मसाला, खिमा पराठा, चुल्हा मटण
पत्ता: 254, चिरंजीव अपार्टमेंट, शॉप न. 7, कर्वे रोड, कोथरूड, पुणे-411029, 020-25442279

२०. हॉटेल वाझवान
'ऑर्डर' दिल्यानंतरच पदार्थ तयार करण्याची पद्धत.
तबकमाझ, गुश्‍ताबा, मुर्ग याखनी, रवा, सर्वांत शेवटी- दूध, केशर आणि सुकामेव्यापासून बनविलेला "फिरनी' ही खास काश्‍मिरी खीर.
पत्ता: बाणेर रस्त्यावर "पॅनकार्ड' क्‍लबकडे जाणारा फाटा सोडला, की थोडेसे पुढे गेलात की वाझवान.

२१. हॉटेल अभिषेक
पत्ता: म्हात्रे पूलाकडून संत गुळवणी महाराज चौकातून स्वप्नशिल्प सोसायटीकडे जाणारा रस्ता.

२२. चायनीज रूम
पत्ता: चायनीज साठी, कर्वे रस्त्यावरील

२३. ऑफ बीट
पत्ता: कर्वे रस्त्यावरून झाला कॉम्प्लेक्स च्या चौकात डावीकडे पिज्झा हट कडे वळालं (स्वप्नशिल्प सोसायटीच्या रस्त्याला/कोथरूड सिटिप्राईड थिएटर कडे) की उजव्या बाजूस आहे १ल्या मजल्यावर.

२४.. हॉटेल सदानंद
पत्ता: कर्वे रस्त्यावरचं मॅक्डोनल्ड च्या आधी आहे, यांचचं पुणे-मुंबई बाह्यवळण मार्गावर बाणेरपाशी दुसरं आहे.

२५. हॉटेल गुडलक
पत्ता: डेक्कन

२६. हॉटेल खैबर, हॉटेल पूनम
पत्ता: दोन्ही, डेक्कन

२७. हॉटेल निमंत्रण
पत्ता: बिबवेवाडी रस्त्यावरचं, पुष्पमंगल कार्यालयाजवळचं

२८. हॉटेल सृष्टी [मासे]
पत्ता: सदाशिव पेठेतलं.
टिळक स्मारक मंदिरासमोर एक रस्ता जातो पेरूगेट(पो.चौ.)कडे...
१. जर तुम्ही स.प महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या म्हणजेच टिळक रस्त्याने आलात, अलका टॉकिजच्या दिशेने, तर तुम्हाला उजवीकडे वळता येणार नाही (टि.स्मा. चौकात)...
२. त्यामुळे स.प महाविद्यालयावरून थोडं पुढे आलात की डाव्या बाजूला महाराष्ट्र बँक आहे त्याला लागूनच एक छोटी गल्ली टि. स्मा कडे जाते...त्यातून पुढे जा आणि उजव्या हाताला वळा, जसा रस्ता जातो तसं...मग तुम्ही आपोआप सिग्नल पाशी याल्...सिग्नल ओलांडून सरळ जा.
३. उजव्या हाताला दुर्गा हॉटेल आहे...त्याच लायनीत उजव्या बाजूलाच 'सृष्टी' आहे...सिग्नल पासून हार्डली १०० मी.

२९. हॉटेल कोयला [द हैद्राबाद हाउस]
हैदराबादी बिर्याणी, एकदम निजामी थाटाचं
पत्ता: कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रोड

३०. कोकण एक्स्प्रेस
पत्ता: कोथरुड, दशभुजा गणपती वरुन सरळ महर्षी कर्वे पुतळ्याकडे य
                         


No comments: